Saturday, 15 December 2018

#MeeToo अक्षय कुमारने रद्द केले 'हाऊसफुल 4 चे शुटिंग

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूडमध्ये सध्या 'मी टू' मोहीमेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे, बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांनंतर आता दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत.

या आरोपांनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत साजिद खानने 'हाऊसफुल 4' या सिनेमाचं दिग्दर्शन सोडलं आहे.

या सिनेमातील अभिनेता अक्षय कुमारने देखील या सिनेमाचे शूटिंग रद्द केले आहे.

अभिनेत्री सलोनी चोप्राने साजिद खानवर लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचा गंभीर आरोप केल्यानंतर साजिदने टि्वट केलं की, 'या आरोपांच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर माझं कुटुंब, निर्माते, हाऊसफुल

4 चे कलाकार यांचा दबाव आणि या आरोपांनंतरची नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्यावरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करत नाही तोपर्यंत या सिनेमाचं दिग्दर्शन सोडत आहे.

माझी सर्व मित्रांना आणि माध्यमांना विनंती आहे की सत्य बाहेर येईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका.'

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य