Wednesday, 19 December 2018

ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाचा वादळाचा धोका वाढला, ८ जणांचा मृत्यू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

ओडिशा आणि आंध्रप्रदेशात धुमाकूळ घालणाऱ्या तितली वादळामुळे आंध्रात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे.

वादळामुळे ओडिशात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

गोपालपूरमध्ये या वादळामुळे मच्छिमारांची एक नाव बुडाली, त्यामध्ये 5 मच्छिमार होते, सुदैवाने या मच्छिमारांना वाचवण्यात यश आलं आहे.

सध्या हे वादळ उत्तर आंध्रप्रदेशातून आणि दक्षिण ओडिशातून पश्चिम बंगालच्या दिशेने सरकलं आहे, ओडिशामध्ये येत्या 12 तासांत जोरदार वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव ओडिशातील 3 लाख लोकांना तटवर्ती प्रदेशातून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य