Saturday, 15 December 2018

आलोकनाथ यांचे ‘हे’ रुप मला अनेक वर्षाआधीच कळले होते - रेणुका शहाणे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

टीव्ही आणि बॉलिवूडच्या दुनियेत ‘संस्कारी बाबूजी’ अशी ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे.

मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादानंतर याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे.

तसेच हम साथ साथ है चित्रपटातील महिला सदस्यासमोरच आलोक नाथ यांनी कपडे काढले असल्याचे या महिला क्रू मेंबरने एका मुलाखतीत सांगितले आहे. यानंतर आता संध्या मृदुलने आलोकनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संध्याने एका मालिकेत आलोक नाथ यांच्यासोबत काम केले होते, या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तिला खूप वाईट अनुभव आला होता.

आलोक नाथ मला सर्वांसमोर मुलीसारखं वागवायचे, मात्र त्यांच्या संस्कारी चेहऱ्यामागे एका असभ्य पुरुषाचा चेहराही दडला आहे.

चित्रीकरणाच्या काळात माझ्या रुममध्ये येऊन असभ्य वर्तन केलं असे अनेक गंभीर आरोप संध्याने केले आहेत.

रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोकनाथ यांच्या मुलीची भूमिका पार पाडली होती.

नेमकं काय म्हणाली रेणुका

  • आलोक नाथ यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपानंतर रेणुकाने एका वेबसाइट्शी बोलताना सांगितले की, माझे भाग्य चांगले होते की माझे कधीच त्यांच्यासोबत आउटडोअर शूट नव्हते.
  • माझा त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.
  • मात्र त्यांची दोन रूपं आहेत असे मी आधीच ऐकले होते. दारू प्यायल्यानंतर त्यांना भान नसते असे मी ऐकून होते.
  • दीपिका देशपांडे या अभिनेत्रीने मला त्यांच्या या दोन रूपांविषयी नव्वदच्या दशकातच सांगितले होते.
  • तसेच ते पार्टीत दारू पिऊन तरुण मुलींशी वाईट वागतात असे मला काहींनी सांगितले होते.
  • पण आता आलोक नाथ यांच्यावर सगळ्यांनी केलेल्या आरोपानंतर मला चांगलाच धक्का बसला आहे. 
loading...

Top 10 News

राशी भविष्य