Tuesday, 18 December 2018

पुण्यात पार पडली भारतातील पहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

भारतातील पहिली कवटी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.

इशिता या 4 वर्षांच्या चिमुकलीच्या मेंदुची निकामी झालेली कवटी बदलून डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून तिची सुटका केली आहे.

पुण्यातील भारती हॉस्पिटलमधील इशिता या चिमुकलीला एक वर्षांपूर्वी एका चारचाकी वाहनानं धडक दिली होती, या अपघातात तिच्या डोक्याला प्रचंड मार बसला होता.

तिला रुग्णालयात नेईपर्यंत डोक्यातून भरपूर रक्त वाहून गेलं होतं, तिच्या मेंदुच्या आजुबाजूची 60 टक्के कवटी पूर्णपणे निकामी झाली होती.

इशिताच्या कवटीतील हाडांना अनेक जखमा झाल्या होत्या, ती जगेल की नाही याचीही डॉक्टरांना शंका होती.

मात्र भारती हॉस्पिटलमधील डॉ रोकडे आणि डॉ ओसवाल यांनी या चिमुकलीला वाचवल नाही तर तिला मृत्यूच्या दारातून बाहेर काढल आहे.

ऑपरेशन करताना मोठ काम होतं मात्र डॉक्टरांनी हार न मानता चिमुकलीला वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि अखेर इशिता जीवदान दिले.

अशी यशस्वी झाली ही शस्त्रक्रिया

  • सर्वप्रथम तिच्या मेंदुला धक्का पोहोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली.
  • काही न्यूरो सर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची जखमी हाडं अलगदपणे काढून टाकली.
  • ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होऊ दिली नाही, यामुळे मेंदूला इजा होण्याचा धोका टळला.
  • पण डोक्यासाठी नवीन कवटी बसवणं गरजेचं होतं, त्यामुळे अमेरिकेतून खास एक कृत्रिम कवटी मागवण्यात आली.
  • दोन ते तीन किचकट शस्त्रक्रिया करून ही कवटी तिच्या डोक्यात बसवण्यात आली.
  • या सगळ्यात दीड वर्षाचा काळ गेला, पण आता त्या चिमुकलीचं आयुष्य पुर्ववत झालं आहे.

त्यामुळे या चिमुकलीच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे, ज्या व्यवस्थेवर आपण नेहमी टीका करतो त्या महापालिकेपासून ते मंत्रालयापर्यत सर्वांनी इशीताला वाचवण्यासाठी मदत केली. त्यामुळे इशिताच्या कुटुंबाने या सर्वांच्या मदतीमुळे इशिता जगू शकली अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

आता लवकरच इशिता पहिल्यासारखी चालू फिरू शकणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य