Tuesday, 18 December 2018

जेजुरीतील मंदिरावरील सोन्याच्या कळसावर हॅलिकॅप्टरद्वारे पुष्पवृष्टी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

महाराष्ट्राचे कुलदैवतलोकदेव असलेल्या जेजुरीतील खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील सोन्याच्या कळसाचे कळसपूजन करुन हॅलिकॅप्टरद्वारे पुष्पवृष्टी करुन अनावरण करण्यात आले.

जेजुरीच्या खंडेरायाला राज्यातील भाविकभक्तांनी देणगीदाने व नवसपूर्तीसाठी अर्पण केलेल्या आणि देवसंस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याच्या विविध अलंकारातून व चीज वस्तूंमधून मुख्य मंदिरावरील कलश सोन्याचे करण्यात आले आहे, यासाठी सुमारे दीड किलो शुद्ध सोने वापरण्यात आले आहे.

पुरातन काळापासून खंडेरायाची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे, हे नाव सार्थ करण्यासाठीच मुख्य मंदिराच्या कलशापासून शुभारंभ करण्यात आला आहे.

खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस सोन्याचे करण्याबाबत मागील काळापासून भाविक भक्त व ग्रामस्थ मंडळ मागणी करीत होते, राज्यातील भाविकभक्तांनी देणगीदाने व नवसपूर्तीसाठी अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारातून शुद्ध सोने तयार करून हे काम करण्यात आलं आहे.

श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीने आज कलशपुजन-लघुरुद्रमल्हारी सहस्ञनाम होमहवनआणि इतर धार्मिक विधी करण्यात आले, तसेच हॅलिकॅप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य