Tuesday, 18 December 2018

स्टंटबाज टपोरींना रेल्वेचा चाप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

लोकलमधील स्टंटबाज टपोरींना रोखण्यासाठी आता स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सातत्याने पाहणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने समुपदेशनाप्रमाणेच या फुटेजच्या सहाय्याने स्टंटबाजांना रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. लोकलमधील स्टंटबाज तरुणांच्या कृत्यांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

त्यात जाहिराती, समुदपदेशाप्रमाणेच कारवायादेखील केल्या जातात, तरीही स्टंटबाज टपोरींचा उच्छाद संपुष्टात येत नसल्याने रेल्वेने कारवाईची तीव्रता वाढवण्याची तयारी केली आहे.

मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील सर्वच आरपीएफ चौक्यांना त्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, आरपीएफच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून स्टंटबाजांना शोधून काढण्याचे प्रयत्न करण्यास सांगितले आहे.

रेल्वेच्या नियमानुसार स्टंटबाजांवर रेल्वे कलम 156 नुसार कारवाई केली जाते, या कृत्यात अल्पवयीन मुले आढळल्यास त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते.

पण स्टंटबाजांवर कठोर कारवाई आवश्यक असल्याने त्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत, रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्यांच्या आधारे स्टंटबाजांना शोधणे उपयुक्त ठरणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य