Tuesday, 18 December 2018

आजपासून नवरात्रोत्सवाची सुरूवात, शक्ती अन् श्रेष्ठतेचा 'आजचा रंग निळा'

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

देशभरात आज नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. आदिशक्तीच्या या उत्सवाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय. घरोघरी आणि घटस्थापना होत आहे. नवरात्रींच्या नऊ दिवस नऊ रंग आणि नऊ रुप घेऊन दुर्गा माता अवतरणार आहे.

नवरात्रीच्या पूर्वसंध्येला अंबाबाईच्या मंदिराला नेत्रदीपक रोषणाईचा साज चढवण्यात आला.यामुळे मंदिर उजळून निघाले आहे. संपूर्ण मंदिराला मनमोहक अशी आकर्षक विद्युत रोषणाई केली.

तसंच मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिरात भाविकांची गर्दी नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून पाहायला मिळत आहे. सर्वच भाविकांमध्ये घटस्थापनेचा उत्साह दिसून येतोय.

आज मुंबादेवीचं मंदिर पहाटे 5.30 वाजता भाविकांसाठी खुलं ठेवलं असून रात्री 11 पर्यंत देवीचं दर्शन घेता येणार आहे. दरम्यान सुरक्षिततेचीही विशेष काळजी मंदिरात घेण्यात येत आहे.

मुंबादेवी मंदिराची सुरक्षा लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही घटस्थापना होणार आहे. विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीने सर्व मंदिर सजवण्यात आले.

फक्त मंदिरच नाही तर विठुरायाच्या मूर्तीला ही तुळशीने सजवण्यात आले असून हिरव्या तुळशीच्या पेहराववर लाल जर्द फुलांची माळ उठून दिसतेय, तर रुक्मिणी मातेचा गाभारा हा सुवासिक फुलांनी सजवण्यात आला आहे.

तुळशीची सजावट करण्यात आल्याने मंदिर गाभाऱ्याला तुळशी वनाच स्वरूप आलं आणि परिसर तुळशी फुलांच्या सुवासाने दरवाळून निघाला आहे.

या सजवटीमुळे मंदिरातील वातावरण प्रसन्न झाले असून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य