Monday, 10 December 2018

बॉलिवूडचे संस्कारी बाबुजी अडचणीत...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिम सुरू झाल्यापासून एकापाठोपाठ एक नामांकित व्यक्तींची नावं समोर येत आहेत.

या यादीत आता बॉलिवूडच्या संस्कारी अभिनेत्याचं नाव जोडलं गेलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे एका अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये विनता नंदा यांनी त्या अभिनेत्याचं नाव लिहिलेलं नाही. मात्र, आपल्या पोस्टच्या अखेरीस त्यांनी ‘संस्कारी अभिनेता’ असा उल्लेख केला आहे, त्यामुळे त्यांचा रोख अलोक नाथ यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत आहे.

वीस वर्षांपूर्वी त्यांच्या घरातल्या पार्टील माझ्या दारुत काहीतरी मिसळलं आणि त्यानंतर गाडीत माझ्यावर गैरव्यवहार केला असं या पोस्टमध्ये विनता नंदा यांनी म्हटलं, त्या वेळेस मी माझ्या मित्रांना सांगितलं पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही असंही विनता म्हणाली..

 

दरम्यान सिंटा अर्थात CINE AND TV ARTISTS' ASSOCIATIONनं विनीता नंदा यांना पाठिंबा दर्शवला. सिंटाचे जनरल सेक्रेटरी अभिनेता सुशांत सिंह यांनी विनीता नंदा यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसंच, आलोक नाथ यांच्या विरोधात तक्रार दाखल कऱण्यासंही विनीता नंदा यांना सांगितलं आहे.

सुशांत सिंह यांनी केलं ट्विट
loading...

Top 10 News

राशी भविष्य