Sunday, 20 January 2019

दीड दिवसांच्या बाप्पाला आज निरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दीड दिवसांच्या लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे, त्यामुळे महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

गणपती विसर्जनाची तयारी मुंबईच्या चौपाट्यांवर दिसून येते आहे, दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबईसह ठिकठिकाणी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.

दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिस यंत्रणेनंही विशेष काळजी घेतली आहे.

काही ठिकाणी कृत्रिम तलावांचीही निर्मिती करण्यात आली आहे, तर दादर मधील क्रीडा भवन मध्ये तलाव तयार करण्यात आले आहेत.

बाप्पांच्या निरोपामुळे आज मुंबईतील समुद्रकिना-यावरचं वातावरण भारावून जाणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य