Sunday, 20 January 2019

राज्यभरात बाप्पाचं मोठ्या जल्लोषात WELCOME...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आज गणेश चतुर्थी... संपूर्ण राज्यभरात अगदी उत्साहाने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, या जयघोषात  बापाचं आगमन झालं आहे.

सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेल्या असून ढोल-ताशांच्या गजरामध्ये गणरायाची मूर्ती घराघरात, सार्वजनिक मंडळांमध्ये घेऊन जात आहेत.

लालबागचा राजा येथे ही मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. यंदा राजाच्या मूर्तीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. दरवर्षी सिंहासनाधिश असलेला राजा यंदा दगडावर बसून पर्यावरण पूरक संदेश देत आहे.

पहाटे 4 वाजता लालबागच्या राजाची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर चरणस्पर्शची रांग भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे.

हिरव्यागार शेतामधून वाट काढत कोकणातल्या घरा-घरांत विघ्नहर्त्याचं आगमन झालं आहे. डोक्यावर गणेश मूर्ती बाप्पांच्या स्वागताची परंपरा कोकणात आजही कायम आहे.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य