Wednesday, 16 January 2019

आगामी निवडणुकांसाठी राज्यात महाआघाडी - अशोक चव्हाण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतला आहे.

निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली.

या बैठकीनंतर महाआघाडी करण्याबाबत सहमती झाली असून लवकरच इतर पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

या बैठकीला सुशीलकुमार शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माणिकराव ठाकरे, सुनिल तटकरे यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य