Wednesday, 16 January 2019

आता पुण्यातही जातवैधता प्रमाणपत्रावरुन 7 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

कोल्हापूर महापालिकेनंतर आता पुण्यातही जातवैधता प्रमाणपत्रावरुन 7 नगरसेवकांचे पद रद्द झाले आहेत.

निवडणुकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र 6 महिन्यांच्या मुदतीमध्ये सादर न करणाऱ्या 7 जणांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

या शिफारसीचा अहवाल आयुक्त सौरभ राव यांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे.

पद रद्द झालेल्यांपैकी 5 नगरसेवक सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे असून 2 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.

पद रिक्त झाल्यामुळे पुढील 6 महिन्यात या जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 5 नगरसेवकांचे पद रद्द होणार असले तरी सत्ता समीकरणांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

पद रद्द झालेल्या नगरसेवकांची नावे

 भाजपाचे नगरसेवक 

  • किरण जठार
  • आरती कोंढरे
  • फरजाना शेख
  • कविता वैरागे
  • वर्षा साठे 

राष्ट्रवादी नगरसेवक

  • बाळा धनकवडे
  • रूखसाना इनामदार
loading...

Top 10 News

राशी भविष्य