Saturday, 17 November 2018

भारत बंदला न जुमानता नागपुरात निघाली जगातील ही एकमेव मिरवणूक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दरवर्षी पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्ह्या पोळ्याला नागपूर शहरात अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि वाजत गाजत मारबतींची मिरवणूक काढली जाते. यावर्षी देखील अशीच मिरवणूक काढण्यात आली. शहरातील इतवारी चौकातील नेहरू पुतळा चौक परिसरात पिवळ्या आणि काळ्या मारबतीचा मिलन सोहळा पार पडला. सोबतच या मिरवणुकीत अनेक बडग्याची मिरवणूक काढण्यात आली.

नागपूर आणि विदर्भातील हजारो लोक या मारबती पाहण्यासाठी नागपुरात येतात.

मारबत आणि बडग्या हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपूरातच होतो हे विशेष...

या मिरवणुकीचं वैशिष्ट्य...

या काळात रोगराई वाढते.

त्यामुळे ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’  अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ झाला.

काँग्रेसच्या 'भारत बंद'ला न जुमानता यंदाही ही राजकीय आणि सामाजिक विषमता ठेवत ही मारबत काढण्यात आली.

बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतिक मानले जातात.

त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे असतो. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते.

काळी मारबत - 

काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडला जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. हा  एक जत्रेचाच प्रकार आहे. मारबत बडगा बघण्यासाठी विदेशी पाहुणेही आवर्जून हजेरी लावतात.

मारबत ही जवळपास सारख्याच स्वरुपाची असली तरी ‘बडगे’ मात्र वेगवेगळ्या विषयांवर असतात.

हे विषय मिरवणूक निघाल्यावरच कळतात. 

पिवळ्या मारबतीला आता सव्वाशे वर्षं झाली आहेत तर काळ्या मारबतीला १३७ वर्षं पूर्ण झाली आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य