Wednesday, 16 January 2019

एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जकार्तामध्ये आशियाई स्पर्धेत भारताची दमदार सुरूवात झाली आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

विनेश फोगाटने अंतिम फेरीत जपानच्या युकी आईरीवर मात केली. या विजयासह विनेश आशियाई खेळांमध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

आशियाई खेळाच्या दुसऱ्यादिवसाअखेर भारताच्या नावावर 5 पदकं आहेत. यात दोन सुवर्ण, दोन सिल्व्हर आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. कुस्तीपटू बजरंग पुनीयाच्या नावावर सुवर्ण, एअर रायफल शुटींगमध्ये दीपक कुमारला रौप्यपदक, लक्ष्य शिरॉनला ट्रॅप शुटींगमध्ये रौप्यपदक तर रवी कुमार आणि अपुर्वी चंडेला या जोडीने एअर रायफल शुटींगमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.

Asian Games 2018 Medal

एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू बजरंग पुनियाचं सुवर्ण वाजपेयींना समर्पित...

नेमबाजीमध्ये दीपक कुमारची 'रौप्य' कामगिरी

 

 
loading...

Top 10 News

राशी भविष्य