Wednesday, 16 January 2019

निकसह सासू सासऱ्यांसोबत प्रियंकाने दिली अनाथाश्रमाला भेट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा नुकताच तिचा बॉयफ्रेंड निक जोनाससोबत साखरपुडा झाला. त्यानंतर प्रियंकाने आपला भावी पती निकसह सासूबाई डेनिस आणि सासरे केविन जोनास यांच्यासह अंधेरीतील सेंट कॅथरीन अनाथाश्रमाला भेट दिली.

या भेटीचा एक व्हिडिओ प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये प्रियांका तिच्या 'गुंडे' या चित्रपटातील 'तूने मारीं एंट्रियां' या गाण्यावर मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे.

तसेच प्रियंकानेही निक गातानाचा एक व्हिडिओही आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निकसोबत आई डेनिस मिलरही गाताना दिसत आहे.     

त्यानंतर रात्री निक त्याच्या आईवडिलांसोबत अमेरिकेला परतला. निक गुरुवारी साखरपुड्याकरिता  आपल्या आईवडिलांसोबत मुंबईमध्ये आला होता. शनिवारी रोका सेरेमनीनंतर प्रियांकाच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

loading...

Top 10 News

राशी भविष्य