Wednesday, 16 January 2019

Update : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या हत्या प्रकरणात सीबीआयने औरंगाबाद येथील कुंवारफल्ली भागात राहणाऱ्या सचिन अणदुरेला अटक केली आहे.

काहीदिवसांपूर्वी मुंबई एटीएसने औरंगपुरा भागातून सचिनला नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान डॉ. दाभोलकर हत्येचे धागेदोरे सापडल्यानंतर सीबीआयने पुण्यामध्ये ही अकारवाई केली.

डॉ. दाभोलकरांवर सचिननेचं गोळ्या झाडल्या असल्याटचा दावा सीबीआयने केला आहे.

 

कळसकरच्या चौकशीतून सचिनचे नाव समोर

नालासोपऱ्यात स्फोटक सापडल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतच्या चौकशीदरम्यान सचिनचे नाव

दरम्यान कळसकरनंतर राजाबाजार भागातून एटीएसने सचिनला पकडले होते.

 

सचिन अणुदुरेनी दिली हत्येची कबुली

 • डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा
 • सचिन अणदुरेनी स्वत: दिली हत्येची कबुली
 • हत्येदरम्यान मोटारसायकलचा वापर नाही
 • दोघांनी दाभोलकरांवर 2 राऊंड फायर केले
 • दोघांकडे एकूण 3 रिवॉल्व्हर होत्या
 • फायरिंगनंतर पळ काढण्यासाठी मोटारसायकल तयार होती
 • हत्येनंतर दोघेही मोटरसायकलवरून पळाले
 • सीबीआयच्या चौकशीत सचिन अणदुरेनी दिली माहिती
 • सीबीआयच्या सूत्रांकडून मिळाली माहिती
 • डॉ. दाभोलकरहत्याप्रकरणी सचिन अणुदुरेची आज कोर्टाची सुनावणी पार पडली
 • दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अणदुरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
 • सचिन अणदुरेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
 • शिवाजीनगर कोर्टाने सचिन अणदुरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

 

याबाबत हमीद दाभोलकर काय म्हणाले ?

या कारवाई बाबत हमीद दाभोलकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

मात्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधार शोधून काढण्याचं महत्वाचं काम आता तपास यंत्रणासमोर आहे. 

हेच जर आधी झालं असत तर कलबुर्गी,पानसरे आणि गौरी लकेश यांचे जीव वाचले असते अशीही खंत हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य