Wednesday, 16 January 2019

एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही,मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलं हे कारण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही, मात्र, टप्प्याटप्प्यात निवडणुका घेतल्या गेल्यास राज्यांमधील निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत घेणे शक्य होऊ शकेल, संपूर्ण देशात एकत्र निवडणुका घ्यायच्या झाल्यास कायद्यात आवश्यक ती सुधारणा करावी लागेल, तसेच ईव्हीएम योग्य प्रमाणात उपलब्ध कराव्या लागतील, आवश्यक त्या गरजांची पूर्तता झाल्यास निवडणुका एकत्र घेणे शक्य होऊ शकेल.

'वन नेशन वन इलेक्शन'

  • ‘वन नेशन वन इलेक्शन’साठी केंद्र सरकार देखील आग्रही आहे.
  • २०१४ साली सत्तेवर आल्यापासून मोदी सरकार या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे.
  • शिवाय, बुद्धिजीवींकड़ून देखील त्याबाबतची मते आजमवली जात आहेत.
  • नुकतेच अमित शहा यांनी देखील ‘वन नेशन वन इलेक्शन’चा पुनरूच्चार केला.
  • त्यामुळे आमागी लोकसभा निवडणुकीसह देशातील ११ ते १२ राज्यांच्या विधानसभा होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.
loading...

Top 10 News

राशी भविष्य