Wednesday, 16 January 2019

रणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलीवुडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेचं दीपिका आणि रणवीर लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी बातमी तुम्ही खुप वेळा ऐकली असणारं. मात्र आता अखेर दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तारीख कन्फर्म झाली आहे.

फिल्मफेअर मासिकेच्या रिपोर्टनुसार रणवीर-दीपिकाचा विवाह सोहळा 20 नोव्हेंबरला इटलीमध्ये पार पडणार आहे.

या विवाह सोहळ्याचं आमंत्रण 30 पाहूण्यांना देण्यात येणार आहे. तसेच लग्नानंतर मुंबईत ग्रॅंड रिसेप्शन आयोजित करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रणवीर-दीपिकाने लग्नासाठी इटलीतील ‘लेक कोमो’चे वेन्यू फाइनल केले आहे.

याआधी विराट-अनुष्कानेदेखील इटलीतील टस्कनीमध्ये सीक्रेट वेडिंग केले होते.

दिपिका रणवीरच्या लग्नाची तारीख फाइनल झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यामध्ये सर्वात प्रथम 'कबीर बेदी' याचं नाव येतं कारण ही बातमी कळताचं त्यांनी आपल्या ट्विटरवरून रणवीर-दीपिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीनंतर आता रणवीर-दीपिकाच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य