Wednesday, 16 January 2019

ज्येष्ठ रंगकर्मी जयवंत नाडकर्णी यांचे निधन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ज्येष्ठ नटवर्य जयवंत नाडकर्णी यांचे अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. जयंत नाडकर्णी यांना राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाची अनेक सुवर्ण पदके मिळाली आहेत. तसेच त्यांना मुंबई महानगर पालिकेतून १९८४ या वर्षी निवृत्त होईपर्यंत खात्यांतर्गत, आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत सर्वोत्क्रुष्ट अभिनयाचे, दिग्दर्शनाचे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत


जयवंत नाडकर्णी यांची कारकीर्द  -

  • जयवंत नाडकर्णी हे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक यांचे पट्टशिष्य.
  • रंगमंचाचा श्रीगणेशा त्यांनी नानासाहेबांकडूनच गिरवला.
  • नाडकर्णींनी त्यांच्या सोबत हँम्लेट आणि इतर व्यावसायिक नाटकांत महत्वाच्या भूमिका सादर केल्या. 
  • ज्येष्ठ कलाकार,दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या रंगायन या नाट्यसंस्थेच्या स्थापनेपासून रंगायनने सादर केलेल्या प्रत्येक नाट्य कलाकृतीत नाडकर्णी यांचा प्रामुख्याने सहभाग होता.

या नाट्यकृतीत त्यांचा सहभाग - 

 

  • शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक,मी जिकलो मी हरलो, वर्तुळाचे दुसरे टोक, 
  • माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी अशा नाट्यकृतीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
  • नाडकर्णी यांनी अरुण काकडे, माधव वाटवे, विमल जोशी, लालन सारंग, कमलाकर सारंग, कमलाकर नाडकर्णी, 
  • दामु केंकरे, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे,कुमुद चास्कर, श्री.अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, उषा नाडकर्णी, स्नेहलता प्रधान अशा ज्येष्ट कलाकारांसोबत अनेक प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाट्यकृती सादर केल्या. 
loading...

Top 10 News

राशी भविष्य