Wednesday, 16 January 2019

राहण्यासयोग्य असलेल्या शहरांच्या यादीत पुणे-मुंबई अव्वल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने देशातील जगण्यायोग्य आणि राहण्यासयोग्य असलेल्या शहरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून पुण्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.  

मात्र, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला पहिल्या ५० शहरांच्या यादीत स्थान मिळू शकलेलं नाही. महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश जगण्यायोग्य असलेल्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. पुणे, नवी मुंबई आणि मुंबईनं पहिले तीन क्रमांक पटकावल्यावर या यादीत ठाण्यानं सहावा क्रमांक मिळवला आहे.

या यादीत दिल्लीला ६५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. कोलकाताने या सर्व्हेक्षणात भागच घेतला नव्हता. त्यामुळे कोलकाताचा या यादीत समावेश करण्यात आला नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. 

  • महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश 
  • पुणे, नवी मुंबई आणि मुंबईनं पहिले तीन क्रमांक पटकावले
  • ठाण्यानं सहावा क्रमांक मिळवला आहे. 
  • उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडूमधील एकाही शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान नाही.
  • मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या राजधान्यांचा देखील पहिल्या दहा शहरांच्या यादीत समावेश 
  • दिल्लीला ६५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले 
  • कोलकाताने या सर्व्हेक्षणात भागच घेतला नव्हता
loading...

Top 10 News

राशी भविष्य