Saturday, 15 December 2018

आंदोलन करणारे लोक मोर्चामधील नाहीत - मराठा समन्वय समिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठिय्या आंदोलनावेळी आंदोलन करणारे लोक मराठा मोर्चामधील नव्हते. मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्याने हिंसाचार झाल्याचे स्पष्ट करत यापुढे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलने करणार नाहीत, तालुका व जिल्हास्तरावर चक्री पध्द्तीने आंदोलन सुरुच राहतील असे  मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले आहे. पुण्यात समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

काय ठरले होते आंदोलनाआधी - 

पुण्याच्या बैठकीत तसे ठरलेही होते. शांततेने आंदोलन करायचे, काही ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. पण आंदोलनाला बाह्यशक्तींमुळे गालबोट लागले. आम्ही एक वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही सर्वांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही तेथून गेल्यानंतर हा गोंधळ झाला. एका चांगल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनामध्ये तोडफोड करणारे समाजकंटक होते, असा आरोप त्यांनी केला.

आता असे करणार - 

आत्मक्लेश म्हणून १५ ऑगस्ट रोजी आम्ही चूलबंद आंदोलन करणार आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही शांतता बाळगण्याचे आवाहन करत होतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्याकडून जे नुकसान झाले त्याची आम्ही जबाबदारी स्वीकारतो व त्याची भरपाई करून देऊ, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून अशांवर कारवाई करावी. पण ज्यांचा या तोडफोडीशी संबंध नाही. अशांवर गुन्हे दाखल केले जाऊ नयेत. आम्ही याबाबत पोलिसांशीही चर्चा केली. त्यांनीही जे निरपराध आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ असे आम्हाला आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कृती केले नसल्याचे ते म्हणाले.

  • आंदोलनावेळी जो हिंसाचार घडला त्याचा आम्ही निषेध करतो.
  • आंदोलन करणारे लोक मोर्चा मधील नाहीत 
  • मराठा मोर्चाला बदनाम करणारे लोक यात घुसले आहेत...
  • पोलीस यांचा शोध घेतील
  • औरंगाबाद Midc मध्ये झालेला प्रकार हा परप्रांतीय लोकांकडून झालं 
  • यापुढे राज्य समन्वय समिती आंदोलन ठरविलं
loading...

Top 10 News

राशी भविष्य