Tuesday, 22 January 2019

मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा, हे आहे कारण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मध्य रेल्वेच्या मोटरमननं ‘ओव्हर टाईम’ करण्यास नकार दिला आहे. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु झाली आहे, तर लोकलच्या नऊ फेऱ्या रद्द झाल्या आहे. दुपारी पुन्हा रेल्वेच्या अधिकारी आणि मोटरमन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु असून ठोस आश्वासन मिळेपर्यंत ओव्हरटाईम करण्यास मोटरमननी नकार दिला आहे. 

प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, आसनगावच्या रेल्वे प्रवाशांना मुभा देण्यात आली असून ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

मध्य रेल्वेमध्ये २२९ मोटरमनची पदे रिक्त असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. त्याबाबत मोटरमनमध्ये नाराजीचा सूर असल्याचं समजतंय.

या मोटरमनने शुक्रवारपासून केवळ ८ तास काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गाड्या उशीराने धावणे, काही गाड्या रद्द करणे, असे प्रकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • मध्य रेल्वेच्या मोटारमनने ओव्हरटाईम करण्यास नकार दिलाय
  • 229 जागा रिक्त आहेत त्या तत्काळ भरण्याची मागणी
  • लाल सिग्नल पास झाल्यानंतर सेवेतून काढण्यात येत ते बंद करा
  • या कारणास्तव ज्यांना सेवेतून काढलं आहे त्यांना त्वरित रुजू करण्याची मागणी मोटारमन संघटनांनी मागणी केलीय
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य