Tuesday, 22 January 2019

किकी चॅलेंजचा डान्स करणाऱ्या तरूणांना न्यायालयाने सुनावली ‘ही’ शिक्षा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

किकी चॅलेंजच्या नावाखाली स्टंट करून सोशल मिडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल करणे 3 तरुणांना चांगलचं महागात पडलं आहे. विरार रेल्वे सुरक्षा बलाने या स्टंटबाज तरुणांना बुधवारी ताब्यात घेतले असून त्यांना 3 दिवस रेल्वे स्थानकाची स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून यू टय़ूब आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर 3 तरुण विरार स्थानकात धावत्या लोकलबाहेर किकी चॅलेंज डान्स करतानाचा व्हिडिओ प्रसारित झाला. त्यानंतर विरार रेल्वे सुरक्षा बलाने त्यांच्यावर कारवाई केली. आणि न्यायालयाने त्यांना गुरुवार ते शनिवार या 3 दिवसांत रेल्वे स्थानकात स्वच्छता करणे आणि स्टंटबाजी न करण्याविषयी जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच या कामाचा व्हिडिओ 13 ऑगस्ट रोजी न्यायालयात सादर करण्यास सांगितल आहे. सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत स्टंटबाजी करणाऱ्या या तरूणांना हे काम करायचे आहे.

किकी चॅलेंजची शिक्षा

  • किकी चॅलेंजचा स्टंट करून सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करणे 3 तरुणांना चांगलचं महागात पडलं
  • यू टय़ूब आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर 3 तरुण विरार स्थानकात धावत्या लोकलबाहेर किकी चॅलेंज डान्स करतानाचा व्हिडिओ प्रसारित झाला
  • त्यानंतर विरार रेल्वे सुरक्षा बलाने त्यांच्यावर कारवाई केली
  • आणि न्यायालयाने त्यांना गुरुवार ते शनिवार या 3 दिवसांत रेल्वे स्थानकात स्वच्छता करणे आणि स्टंटबाजी न करण्याविषयी जनजागृती करण्याचे आदेश दिले
  • तसेच या कामाचा व्हिडिओ 13 ऑगस्ट रोजी न्यायालयात सादर करण्यास सांगितले
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य