Saturday, 15 December 2018

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई, 4 जवानांना वीरमरण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठा घातपात घडवण्याचा कट रचला जात असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र सतर्क जवानांनी घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव मोडून काढला आहे. 

दहशतवादविरोधी कारवाई करत असताना जवानांनी दहशतवाद्यांना संपवण्यात यश मिळवलं आहे.

मात्र या लढाईदरम्यान 4 जवानांना वीरमरण आले आहे. शहिदांमध्ये 1 मेजर आणि 3 जवानांचा समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. 

यामध्ये जवानांनी 2 दहशतावाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर नियंत्रण रेषेजवळील परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा काही दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत होते. 

याबाबतची माहिती मिळताच जवान सतर्क झाले आणि परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.

या शोधमोहीमेदरम्यान, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनीही मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू होता. 

यावेळी जवानांना 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं. मात्र 4 दहशतवादी फरार झाले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य