Sunday, 16 December 2018

एनआरसीच्या मुद्द्यावरुन राजकारण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रीय नागरिक रजिस्ट्ररमध्ये आसामच्या ४० लाख लोकांची नावे घुसखोरीच्या यादीवर आज राज्यसभेत चर्चा झाली. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जेव्हा आपली भूमिका मांडली तेव्हा राजीव गांधींचे काम आम्ही पूर्ण केले. काँग्रेसने यासाठीची हिंमत दाखवली नाही अशी टीका केली. त्यानंतर विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ घातला. 

या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. भाजपा मतपेटीसाठी हे राजकारण करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने केला. मात्र मतपेटीचे राजकारण भाजपा नाही तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस करत आहेत. म्हणूनच ते एनआरसीला विरोध करत आहेत असा पलटवार अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत केला.

मला राज्यसभेत बोलू दिले गेले नाही, विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे मला पत्रकार परिषद बोलावली असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केले. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही घुसखोरांची यादी जाहीर करत आहोत. आमचा निर्णय हा देशहितासाठी आहे राजकरण करायचे म्हणून नाही असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातही याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

आसामच्या एनआरसीच्या मुद्द्यावर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया -

  • मुंबई शहराला मर्यादित जागा आहे 
  • यात किती लोक राहणार याला ही मर्यादा आहेत
  • सतत येणाऱ्या लोंढ्यामुळे जागा आणि कायदा व्यवस्थेवर परिणाम होतो
  • मुंबईवर येणार हा ताण थांबवला पाहिजे अशी पक्षाची भूमिका आधी पासून आहे 
  • राज्य सरकार ने कठोर भूमिका घेऊन यांना बाहेर काढले पाहिजे 
  • आसामप्रमाणे एन आर सी लागू करणं गरजेचं आहे  

एनआरसी म्हणजे काय ?

  • आसाम अॅकॉर्डचा करार राजीव गांधी सरकारने केला होता.
  • एनआरसी हा या कराराचा आत्मा आहे.
  • पी. चिदंबरम हे जेव्हा देशाचे गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी बंगाली घुसखोरांना बाहेर काढण्याची घोषणा केली होती.

मात्र आता आम्ही कारवाई केली तर काँग्रेसकडून प्रश्न विचारले जात आहेत. ममता बॅनर्जी यांनी त्यांचे सामान्य ज्ञान थोडे वाढवले पाहिजे असा खोचक टोला अमित शाह यांनी लगावला. ममता बॅनर्जी या निवडणुका समोर ठेवून अफवा पसरवत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य