Tuesday, 18 December 2018

महिलांसाठी खुशखबर... सॅनिटरी पॅड GST मुक्त - केंद्र सरकार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्ठा, दिल्ली

जीएसटी परिषदेत महाराष्ट्राची मागणी मंजूर करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दिली आहे. सॅनिटरी नॅपकीनवरील जीएसटी कर हटवण्यात आला आहे. त्यामुळे आता सॅनिटरी नॅपकीनच्या किंमती कमी होणार आहेत.

जीएसटी कौन्सिलची आज 28 वी बैठक पार पडली. सॅनिटरी नॅपकीवर याआधी १२ टक्के कर आकारण्यात येत होता. 

सॅनेटरी नॅपकिन्सला वस्तू आणि सेवा करातून वगळण्यात यावे यासाठी  महाराष्ट्राच्यावतीने मागणी करण्यात आली होती. महिलांच्या स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय होणे खूप महत्वाचे होते. आज ही मागणी मान्य केल्याबद्दल आपण केंद्रीय वित्तमंत्री पीयूष गोयल यांचे आभारी आहोत असेही मुनगंटीवार यांनी  म्हटले आहे.

  • 28 टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यासह इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. 
  • याच बैठकीत बांबू फ्लोअरिंग वरचा १८ टक्क्यांचा कर दर १२ टक्के करण्यात आला.
  • बांबू उद्योगाच्या वृद्धीसाठी हा निर्णय ही खूप महत्वाचा आहे.
  • महाराष्ट्राच्यावतीने ही मागणीही वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर आग्रहाने मांडण्यात आली होती. 

टिकली, काजळला जीएसटीतून वगळलं मग सॅनिटरी नॅपकीनला का नाही? उच्च न्यायालायानं सरकारला फटकारले

सॅनिटरी नॅपकीनवरच्या कराविरोधात महिलांचे किर्तन आंदोलन

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य