Tuesday, 18 December 2018

नरेंद्र मोदींच्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु झाली असून तेलुगु देसम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांनी मांडलेल्या या प्रस्तावावर सरकारनं सामोरं जाण्याची तयारी दाखवली आहे.

सत्तेच्या 4 वर्षांत प्रथमचं मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडला गेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती, मात्र सभागृहातील गोंधळामुळे तो चर्चेसाठी आणला गेला नाही.

बहुमत असल्याने भाजप सरकारच्या सत्तेला कोणताही धोका नसला तरी या प्रस्तावानिमित्त विरोधकांना महत्त्वाच्या गंभीर प्रश्नांवर मोदी सरकारवर टिका करण्याची संधी मिळणार आहे.

संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

या अविश्वास प्रस्तावावर एनडीएमधील मित्रपक्ष शिवसेनेचा मतदानावर बहिष्कार केला आहे.

तसेच सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधीचं शिवसेना सरकारच्या बाजूनं मत करणार नाही. अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.

नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरु

  • सत्तेच्या 4 वर्षांत प्रथमचं मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव
  • प्रस्तावानिमित्त विरोधकांना महत्त्वाच्या गंभीर प्रश्नांवर मोदी सरकारवर टिका करण्याची संधी मिळणार
  • संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे
  • शिवसेनेचा मतदानावर बहिष्कार
  • सरकारच्या बाजूनं मत करणार नाही. अशी शिवसेनेची भूमिका
loading...

Top 10 News

राशी भविष्य