Wednesday, 16 January 2019

मनसे कार्यकर्ते आक्रमक, मंत्र्यालयासमोरील रस्ताचं फोडला...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

निष्क्रिय युती सरकार मधील मंत्र्यांनाही महाराष्ट्रातील जनतेप्रमाणे खड्ड्यांचा त्रास व्हावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील रस्ता फोडला.

महाराष्ट्रातील खड्डेयुक्त रस्त्यांचा निषेध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात कुधळ आणि फावडे घेऊन मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ता खोदला. या प्रकरणी मनसेच्या 4 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांच्या निषेधार्थ आक्रमक होऊन तुर्भेतील पीडब्ल्यूडी कार्यालयात तोडफोड केली होती. कार्यकर्त्यांच्या या भूमिकेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समर्थन केले.

त्यानंतर आता महाराष्ट्रातील खड्डेमय रस्त्यांबाबत सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी मध्यरात्री मनसेने थेट मंत्रालयासमोरील रस्ता फोडला आहे.

खड्ड्यांवर मनसे आक्रमक

  • सोमवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन तुर्भेतील पीडब्ल्यूडी कार्यालयात तोडफोड केली.
  • तसंच गोरेगावमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर आंदोलन केले.
  • कार्यकर्त्यांच्या या भूमिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाठिंबा दर्शविला.
  • त्यानंतर मनसैनिकांनी मंगळवारी मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोरील रस्ता खोदला.
  • याप्रकरणी मनसेच्या 4 कार्यकर्त्यांना अटक.
loading...

Top 10 News

राशी भविष्य