Thursday, 15 November 2018

ज्ञानेश्वर माऊलीच्या अश्वाचं निधन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यात श्रीमंत शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व असणाऱ्या हीरा नावाच्या अश्वाचे आज म्हणजेच रविवारी सकाळी निधन झाले.

या अश्वाचे निधन हृदय विकाराच्या झटक्‍याने झाले आहे. हिरा हा अश्व मागील 8 वर्षांपासून वारीमध्ये माऊलींच्या सेवेत दाखल असायचा त्याचप्रमाणे तो यावर्षीही पालखी सोहळ्यात दाखल झाला होता.

हा अश्व आळंदी ते पुणे 30 किलोमीटरची वाटचाल करत शनिवारी रात्री पुणे येथे मुक्कामी पोहोचला आणि आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

अश्वाच्या निधनाने वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. वारकऱ्यांच्या माहितीनुसार वारीच्या पुढील टप्प्यात लवकरचं नवीन अश्व माऊलींच्या सेवेत दाखल होणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य