Tuesday, 13 November 2018

राजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीतील बुराडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एकाच घरात तब्बल 11 जणांचे मृतदेह सापडल्याने एकचं खळबळ उडाली आहे. या मृतदेहांमध्ये 7 महिलांचा आणि 4 पुरुषांचा समावेश आहे, पोलिसांच्या माहितीनुसार 10 मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती तसेच त्यांचे हातही बांधलेले होते. तसेच ते सर्वजण फासावर लटकले होते.

मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातले आहेत. एकाचं घरात एकाचं कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र या 11 मृतदेहांमध्ये पोलिसांना 1 मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला त्यामुळे ही सामुहिक आत्महत्या आहे की हत्याकांड आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली असून या प्रकारणाचा तपास सुरु आहे. या घटनेनं परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य