Tuesday, 20 November 2018

आंतरराष्ट्रीय योग दिन, कंगना आणि मोदींनी केलं योगासन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बॉलिवुड क्वीन कंगनानेही योगा दिन केला साजरा आणि योगा करतानाचा व्हिडीओ शेअर केला. योगगुरु बाबा रामदेव यांनी एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या कोटामध्ये २ लाखांहून अधिक लोकांसोबत एकाच वेळी योग करत विश्वविक्रम केला आहे. एकाच वेळी दोन लाखांहून अधिक लोकांनी योगासनं केल्यानं याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरा केला योगदिन

  • योग दिनानिमित्त देशातील सर्वात मोठा कार्यक्रम पार पडला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत योगासने करुन योग दिन केला साजरा

  • वांद्रे रिक्लमेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, खासदार पूनम महाजन आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार योगा केला.
  • आधुनिक जीवनशैलीत प्राचीन चिकित्सा असलेल्या योगचे महत्त्व कायम - मुख्यमंत्री
  • शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं राज्य शासनाला आवाहन

दुसरीकडे, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवनात तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे योगसाधना केली.    

तर योगगुरू बाबा रामदेव यांचा २ लाख नागरिकांसोबत एकत्र योग अभ्यास 

  • राजस्थानच्या कोटामध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी योगदिन साजरा केला.
  • यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील उपस्थितीत होत्या.
  • 2 लाख जण एकत्रित योगा करत असल्याची ही पहिलीच वेळ असल्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

तसेच बॉलिवुड क्वीन कंगनाने शेअर केला योगा करतानाचा व्हिडीओ...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य