Tuesday, 20 November 2018

राहूल गांधींना वाढदिवसानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस आहे. काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण देशभरात आपल्या नेत्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. सध्या राहुल गांधी हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहेत.

19 जून 1970 रोजी जन्मलेले राहुल गांधी यांनी 2004 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला.सुमारे 14 वर्षांपूर्वी राजकारणाची सुरुवात करण्यापासून काँग्रेस अध्यक्ष बनण्यापर्यंत राहुल गांधींमध्ये फार बदल झाले आहेत. त्यांच्या राजकारणाची पद्धतही बदलली आहे.

मागील वर्षी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी गुजरात आणि कर्नाटक निवडणूक ज्या पद्धतीने लढवली, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळाली. गुजरातमध्ये पक्षाला विजय मिळाला नसला तरी कर्नाटकमध्ये भाजपला अखेर त्यांनी मात दिली.

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरद्वारे राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा मोदींनी ट्विटरद्वारे दिल्या आहेत.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य