Sunday, 16 December 2018

भैयू महाराजांच्या सुसाईड नोटचं दुसर पान समोर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भैयू महाराज यांनी आपल्या राहत्या घरी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. भैयू महाराजांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

भैय्यू महाराजांच्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर आपण तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता दुसऱ्या पानावर संपत्तीचा उल्लेख असल्याने सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे देण्याचा उल्लेख केला आहे.

भैयूजी महाराज यांनी मृत्युपूर्वी सुसाईड नोट लिहले होते ज्यामध्ये कुटुंबाची काळजी कुणीतरी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप थकलोय. मी सोडून जात आहे. असे लिहले होते मात्र भैयू महाराजांनी लिहलेलं आणखी एक नोट मिळालं आहे ज्यामध्ये माझ्या माघारी सर्व आर्थिक व्यवहार सेवक विनायकने पाहावा, असा उल्लेख भैयू महाराजांनी केला आहे. भैय्यू महाराजांच्या सुसाईड नोटमध्ये सर्व संपत्तीची जबाबदारी नोकराकडे देण्याचा उल्लेख भैयू महाराजांनी का केला आहे ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य