Tuesday, 22 January 2019

कोर्टवारीनंतर राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 

भिवंडी कोर्टातील सुनावणीसाठी राहुल गांधी आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावली. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र राहुल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण निर्दोष असल्याचा दावा कोर्टात केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले.

भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना सन्मान दिला जात नाही, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला. 

यावेळी राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्यावरुनही सरकारला लक्ष्य केलं. 'आज देशातील तरुणाला रोजगार हवा आहे. मात्र देशातील सर्व वस्तू मेड इन चायना आहेत. मी देशाच्या भविष्यासाठी काम करतो, असा विश्वास तरुणांच्या मनात आहे. त्यांना रोजगार मिळाल्यास आपण चीनशी स्पर्धा करु शकतो. मात्र भाजपाकडून फक्त तरुणांची माथी भडकावण्याचं, दोन समुदायांमध्ये हिंसाचार कसा होईल, यावरच लक्ष दिलं जातं आहे. मोदींना वाटतं मी पंतप्रधान आहे, त्यामुळे माझ्या भाषणावरच देश चालेल,' अशी टीका राहुल यांनी केली.

स्वयंसेवक संघाच्या मानहानीप्रकरण खटल्यातले आरोप बेबुनियाद - राहुल गांधी

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य