Tuesday, 22 January 2019

उस्मानाबाद - बीड - लातूर विधान परिषद निवडणूकीत सुरेश धस यांचा विजय...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

मतदानानंतर 21 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज विधान परिषदेच्या उस्मानाबाद – बीड - लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी विजय मिळवला आहे. सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना 527 मतं तर राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली आहेत. सांकेतिक आकडे लिहलेले असल्यामुळे 25 मते बाद ठरविण्यात आली. या मतमोजणीदरम्यान अशोक जगदाळे आणि सुरेश धस यांच्यामध्ये बाद मतांवरून वाद झाला. उमेदवार सुरेश धस यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला आहे तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पक्षात वाढली आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य