Thursday, 15 November 2018

काय बोलणार भुजबळ? भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

प्रदीर्घ काळ कारागृहात घालवून जामिनावर सुटलेले राज्याचे माजी उपुमख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ आज (रविवार, १० जून) जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहेत. काल 9 जून रोजी हल्लाबोल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी भुजबळ पुण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी पुण्यातील महात्मा फुले वाड्याला भेट दिली होती.

'दुर्दैवानं दोन वर्षे येऊ शकलो नाही, मला जे काही नेते लोक भेटायला आले त्या सगळ्यांचे आभार मानतो.उद्या पक्षाचा वर्धापनदिन आहे आणि  मी पक्षाचा प्रांताध्यक्ष होतो आणि कार्यकर्ता आहे त्यामुळे मला जे काही बोलायच आहे ते उद्याच बोलेन असं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं.

कारागृहातून बाहेर आल्यावर छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाणार की, अन्य पर्यायांवर विचार करणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आपण आपली भूमिका राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरूनच मांडू असे भुजबळ स्पष्ट केले होते.

दरम्यान, बराच काळ अनेक विषयांवर मौन बाळगून असलेले छगन भुजबळ आजच्या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा पुणे येथे आज समारोप होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भुजबळ पुण्यात आले आहेत.

दरम्यान, आज भुजबळ काय बोलणार, काय भुमिका व्यक्त करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, कारागृहातून बाहेर आल्यापासून भुजबळ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, गेल्या काही दिवसात भुजबळ यांना भेटण्यासाठी राजकीय वर्तुळासह इतर अनके क्षेत्रातील मंडळींनी गर्दी केली होती.

अद्यापही भेटींचं हे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणात जामीन मंजूर

येवल्यात पुढची सभा छगन भुजबळांच्या उपस्थितीतच होईल - धनंजय मुंडे

loading...

Top 10 News

राशी भविष्य