Tuesday, 22 January 2019

कोसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई...

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत पावसाने सुरुवातीलाच दमदार दजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने मुंबईसह उपनगर तुंबले आहे. शुक्रवारी रात्री झालेला मुसळधार आणि सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सखोल भागात पाणी साचले आहे. मुंबईची 'तुंबई' होण्यास सुरुवात झाली आहे. संतधार पावसामुळे दादर, हिंदमाता, एल्फिन्स्टन, सायन भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे.

पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून सायन - माटुंगा रेल्वे स्टेशनदरम्यानचे रुळ पाण्याखाली गेले आहेत. याचा परिणाम मध्य रेल्वे तसेच उपनगरीय वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे. काही मार्गावरील लोकल रद्ददेखील करण्‍यात आल्या आहेत. पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा असं प्रशासनाने मुंबईकरांना आवाहन केले आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य