Sunday, 21 October 2018

विराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी #FitnessChallenge ट्विटर वर स्वतःचा एक फिटनेस विडिओ रिकॉर्ड करून पोस्ट केला होता. त्यात त्यांनी विराट कोहली, सानिया नेहवाल आणि हृतिक रोशन यांना फीटनेस चॅलेंज दिले होते. हे आव्हान स्वीकारून नंतर विराटने पंतप्रधान मोदींना फिटनेस चॅलेंज दिले. मोदींनीही हे आव्हान स्वीकारले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मोदींना टोला लगावत आव्हान दिले आहे.

पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती कमी करा अन्यथा आम्ही देशभरात आंदोलन करू, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

 

सध्या मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटरमागे ८५.२९ रूपये इतका आहे. तर डिझेल  ७२.९६ रूपये प्रतिलिटर आहे. दिल्लीमध्ये प्रति लिटर ७७.४७ इतका दर आहे तर डिझेल ६८.५३ रूपये प्रतिलिटर आहे.

तसचं रादजच्या तेजस्वी यादव यांनीही पंतप्रधानांना आव्हान दिले आहे. 

#FitnessChallenge हॅशटॅगची धूम

loading...

Top 10 News

राशी भविष्य