Saturday, 15 December 2018

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे, असं म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. कर्नाटक विधानसभेत 221 आमदार असल्यानं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना सरकार टिकवण्यासाठी 111 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. त्यामुळे भाजपाला आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती.

मात्र ही आमदारांची जुळवाजुळव होत नसल्यानं येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला.

येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएस राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. यानंतर राज्यपालांकडून काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं जाईल.

राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी वेळ देतील. हा कालावधी नेमका किती असेल, यावर बरंच काही अवलंबून असेल.

हा कालावधी जास्त असल्यास 78 आमदार असलेल्या काँग्रेसला आणि 37 आमदार असलेल्या जेडीएसला फोडाफोडीची भीती असेल. हा कालावधी कमी असल्यास काँग्रेस आणि जेडीएसला फायदा होईल. त्यांना फोडाफोडी टाळता येईल आणि बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापन करता येईल. 

येडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद टांगणीवर, उद्याच सिद्ध करावं लागणार बहुमत

येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

loading...

Top 10 News

राशी भविष्य