Friday, 14 December 2018

लच्छू पहेलवान अखेर अटक, औरंगाबाद दंगलीचा आरोपी

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

औरंगाबाद दंगलीला कारणीभूत असलेल्या लच्छू पहेलवानला पोलिसांनी अटक केली आहे. लच्छू पहेलवानने दंगल घडवून आणल्याचा आरोप एमआयएमने केला होता. या प्रकरणात ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गांधीनगर-मोतीकारंजा भागात नळ कनेक्शन कापण्यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यानंतर मध्यरात्री राजाबाजार, शहागंज, जिन्सी, नवाबपुरा, चेलीपुरा परिसरात दंगल पेटली. यात जवळपास 75 दुकाने आणि घरे, 64 वाहने, अशी सव्वादहा कोटींची मालमत्ता भस्मसात झाली. दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक जोमाने कारवाई करीत आहे.

लच्छू पहेलवान याला अटक केल्याची माहिती समजताच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी सिटी चौक ठाण्यासमोर गर्दी केली होती. नेत्यांनी ठाण्यात जाऊन त्याची भेट घेतली. तसेच, कार्यकर्त्यांनी बाहेर गर्दी केल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

कोण आहे हा लच्छू पहेलवान -

  • लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहेलवान
  • लच्छू पहेलवान हा माजी नगरसेवक 
  • धावणी मोहल्ला इथं राहणारा
  • तालीम चालवून पहेलवान तयार करण्याचा त्याचा छंद
  • विद्यार्थीदशेत मारहाण, दादागिरीमुळे जुन्या शहरात त्याचा चांगलाच दरारा
  • याशिवाय लच्छू पहेलवान याच्याविरुद्ध मारहाण करण्याचे विविध गुन्हे दाखल
18 वर्षांच्या एका तरुणाचा खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यातून तो निर्दोष सुटला आहे. त्याच्यासह मुलाने मनपा उपायुक्‍त आयुब खान यांच्या मुलालाही रस्त्यावर  मारहाण केली होती. तेव्हा तत्कालीन पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी त्याला चांगलाच दम भरला होता. याशिवाय लच्छू पहेलवान याच्याविरुद्ध मारहाण करण्याचे विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याची मुलगी राजाबाजार भागाची अपक्ष नगरसेविका आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
 
loading...

Top 10 News

राशी भविष्य