Tuesday, 13 November 2018

येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मु्ंबई

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस. येडियुरप्पा विराजमान झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री झालेल्या युक्तीवादानंतर अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सरकार राखण्यासाठी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आता कर्नाटकात येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागलं आहे. एकट्या बी.एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे.

भाजपकडे सध्या १०४ आमदारांचं पाठबळ आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी ८ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. दोन अपक्ष आणि बीएसपीच्या एका आमदाराने त्यांना पाठिंबा दिला तर हा आकडा १०७ पर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्यांना आणखी ५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. मात्र पाच आमदारांचा पाठिंबा मिळवणं कठिण असल्यानं येडियुरप्पा त्यात यशस्वी होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

कर्नाटक राज्यपालांवर राज ठाकरेंनी डागली तोफ -

कर्नाटक निकालांवर राज ठाकरेंचं खोचक भाष्य - Http://Bit.Ly/2rHPVfN

#Yeddyurappa #karnataka election 2018 #UnconstitutionalCMYeddy

येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

भाजपचे चाणाक्ष फसले; म्हणाले, ‘येडियुरप्पा सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी’

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य