Sunday, 20 January 2019

#मातृदिन - मातृदिनाचं महत्व आणि सेलिब्रेशन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

13 मे रोजी जगभरात 'मदर डे' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मातृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देषाने हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात युनायटेड स्टेट्स मधे मदर्स डे साजरा करायची पद्धत सुरु झाली.

भारतीय संस्कृतीमध्ये आईचं स्थान अतिशय उच्च असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आई ही आपली सर्वश्रेष्ठ गुरु मानली गेली आहे. प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जातं. त्यानंतर युकेमध्ये मदरिंग संडे नावानं हा दिवस साजरा केला जायचा असंही उल्लेख आहेत.

आई...प्रत्येकाच्या आयुष्यातलं अढळस्थान...आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली मैत्रीण, मार्गदर्शक आपलं सबकुछ...ती आपल्यासाठी जे करते त्यातून कधीच आपण उतराई होऊ शकत नाही. पण तिच्याबद्दल थोडीशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे...आता जगभरातल्या जवळपास 46 देशांमध्ये मदर्स डे साजरा केला जातो.

आता मदर्स डे साजरा करण्याचं स्वरूप बदललंय. या दिवशी आपल्या आईला वेगवेगळ्या भेटवस्तू तर दिल्या जातातच. पण एक तरी दिवस तीला विश्रांती मिळावी यासाठीही प्रयत्न केले जातात. काळ बदललाय, पण आई- मुलाचं आई-मुलीचं नातं तेचं राहिलंय. कदाचित पूर्वी फारशी व्यक्त न होणारी आई आता बोलायला लागलीये आणि आता पूर्वी आईबद्दलचं प्रेम फार उघडपणे न दाखवणारी मुलं आता ते व्यक्त करतायेत.आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईचं वेगळं रुप आपल्याला दिसतं. इंटरनेटच्या युगातही हे आई-मुलाचं नातं तितकंच शाश्वत आहे. म्हणूनच मदर्स डे साजरा करायला आजही अर्थ आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य