Sunday, 20 January 2019

IPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आर्श्चयजनक एक्झिट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आपल्या दीर्घ आजाराला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होते. आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.  एक तडफदार आणि कर्तबगार पोलीस अधिकारी अशी आेळख असलेले हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

१९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे हिमांशू रॉय यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणं हाताळली होती. 2013 मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. 

 

 

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य