Sunday, 20 January 2019

अवकाळी पावसाचा फटका.....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, कोल्हापूर

सांगली आणि कोल्हापूरात अचानकपणे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपले आहे. अजूनही पाऊस सुरू असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाबरोबर आलेल्या जीवघेण्या वादळाने सांगलीकरांच्या हृदयाचा मात्र ठोका चुकला. तब्बल अर्धा तास हा गारांचा पाऊस सुरू आहे. यामुळे शहरात अनेक भागात पाण्याची तळी साचली आहेत. या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकरी वर्ग तसेच डाळिंब आंबा उत्पादकांना पावसाचा फटका बसला आहे. 

कोल्हापूरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाला लोकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या,मात्र उष्णतेने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य