जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
नाणारचा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलं आहे. रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील आसिफा बलात्कार प्रकरणावरुनही त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला.