Monday, 21 January 2019

2019 च्या निवडणूकीत काँग्रेससोबत ‘हात’मिळवणी करणार : पवारांची घोषणा

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत समविचारी पक्षांशी युती करण्याचा आपला विचार आहे. म्हणूनच 2019 ची निवडणूक आपण काँग्रेससोबत लढणार असल्याची घोषणा काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते पालघर येथे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसेल, दहशतवादी हल्ले कमी होतील, असं मोदींनी सांगितलं होतं. पण सरकारला मोसूलमध्ये मारल्या गेलेल्या 39 लोकांची माहिती 1 वर्षानंतर मिळते, असं म्हणत त्यांनी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं.

मागील निवडणूकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले होते. दोघांनाही याचा फटका बसत सत्ता गमवावी लागली होती. त्यामुळे आता पवारांनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यानंतर सत्तेची समीकरणं बदलतायत का ?, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य