Thursday, 17 January 2019

आज राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्य़ूज, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता सभा सुरु होणार आहे. दरम्यान त्यासाठी राज्यभरातल्या ठिकठिकाणाहून मनसे कार्यकर्ते मुंबईत पाच वाजे पर्यंत दाखल होणार आहेत.

मनसेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी या जाहीर सभेची घोषणा केली होती. तेव्हापासूनच मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मुंबईत येण्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली होती.

आज होणाऱ्या सभेत पक्षातील मरगळ झटकून कार्यकर्त्यांना एकजूट करण्यासाठी त्यांच्या समोर नवे संकल्प, नवे कार्यक्रम राज ठाकरे ठेवतात का? पक्षाची पुढील वाटचाल काय असेल? त्यांची भूमिका जाहीर करतात का? याच्याकडे राजकीय वर्तुळासह तमाम मराठीजनांचे लक्ष लागले आहे.

त्यामुळे आजच्या शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरे काही नवीन भूमिका मांडूणार आहेत का त्यातून राजकीय समीकरणांना नवे वळण येईल का, हे पाहणं गरजेच ठरेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य