Monday, 21 January 2019

2018-2019 आर्थिक अर्थसंकल्प, काय आहेत शासनाच्या तरतूदी?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजेट सादरीकरणास सुरुवात केली. तसेच, शेतकरी हिताच्या योजनांसाठी अंदाचे 83 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी या घटकाबरोबरच सर्वसामान्य व्यक्ती, नोकरदार आणि व्यापारी या सर्वांना सामावून घेणारा अर्थसंकल्प सादर करु, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दरम्यान बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धीविनायकाचं दर्शनही घेतले.

महाराष्ट्राचे महाबजेट  :

शेती आणि सिंचन

 • जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांकरता निधी
 • जलसंपदा विभागाकरता 8233 कोटी
 • अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पांपैकी 50 प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य
 • कोकणातील पाटबंधारे प्रकल्पासाठी 60 कोटींची तरतूद
 • जलयुक्त शिवारासाठी 1500 कोटी
 • 82000 सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी 132 कोटी
 • मागेल त्याला शेततळे या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण. यासाठी 160 कोटीची तरतूद
 • सूक्ष्म सिंचनासाठी 432 कोटी
 • वनशेतीला प्राधान्यसाठी 15 कोटींची तरतूद
 • सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद
 • फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड योजनेसाठी 100 कोटी
 • मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी 50 कोटॉ
 • पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्पांना 8,233 कोटी
 •   शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 46 लाख 34 हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार 

कर आणि महसूल

 • राज्यात 5 लाख 32 हजार नवे करदाते
 • जीएसटी अंतर्गत 45 हजार कोटी रक्कम प्राप्त झाली
 • मुंबई महापालिकेसह इतर पालिकांना 11 हजार कोटी रक्कम दिली गेली.

स्मारकांसाठी तरतूद

 • अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी 300 कोटी
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 150 कोटी
 • लहुजी वस्ताद यांचं पुण्यात स्मारक उभारणार
 • अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ सामाजिक सभागृह बांधली जातील
 • सभागृहासाठी 30 कोटींची तरतूद

नोकरी/रोजगार

 • सर्व क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न
 • स्टार्ट अपचा विकास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलंस उडान आणि इन्क्युबेशन सेंटरच्या स्थापनेसाठी 5 कोटी
 • 5 लाख रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचं लक्ष्य.
 • रेशीम उद्योग विकासातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 3 कोटींचा निधी प्रस्तावित

दिव्यांगांसाठी तरतूद

 • दिव्यांगाना मोबाईल स्टॉल देण्यासाठी 25 कोटींची तरतूद
 • वय वर्ष 15-16 पर्यंत दिव्यांगांना प्रतिमहिना 800 ते 1000 पर्यंत मदत

गृह विभागासाठी 13385 कोटींची तरतूद 

 • राज्यातील सर्व पोलीस स्टेशन सीसीटीव्हीच्या माध्यामातून नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येतील- 150 कोटी 92 लाख
 • संबंधित पोलीस ठाणे आणि न्यायालय समन्वयासाठी 25 कोटी
 • पोलीस स्टेशनमधील ई गव्हर्नन्स योजनेसाठी114 कोटी 99 लाख
 • सर्व पोलीस ठाणी CCTV ने जिल्हा पोलीस नियंत्रणला जोडण्यासाठी 165 कोटी 92 लाख

शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद

 • स्कील इंडिया - कुशल महाराष्ट्र योजना : राज्यातील 15 ते 25 वयोगटातील मुलांसाठी कौशल्य प्रदानाचा कार्यक्रम
 • स्टार्टअप उदोयगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कार्यक्रम
 • परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांसाठी परदेश रोजगार कौशल्य विकास केंद्र
 • महाराष्ट्रात 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना होणार
 • जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांसाठी 50 कोटी 
 • मानव विकास मिशनसाठी 350 कोटी
 • आकांक्षित जिल्ह्यांना 121 कोटी
 • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा उभारणारणीसाठी 36 लाखांची तरतूद
 • विद्यार्थ्यांचं विद्यावेतन 400 रुपयापर्यंत वाढवलं
 • राजर्षी शाहू महाराज शिक्षणशुल्क योजना मर्यादा 6 लाखावरुन 8 लाखांपर्यंत वाढवलं
 • अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 400 कोटींची तरतूद

आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद

 • नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटी
 • गर्भवती गरीब महिलांसाठी 65 कोंटीची तरतूद
 • सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांसाठी 20 कोटींची तरतूद
 • कुपोषणावर  मात करण्यासाठी 21 कोटी 19 लाख

 पायाभूत सुविधा

 •  मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रोची कामं सुरु
 • सेवा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न
 • सूत गिरण्यांना 3 रुपये प्रती युनिट वीज देण्याचे काम सरकार करेल
 • ट्रान्स हार्बर सागरी मार्ग उभारणीसाठी 17 हजार कोटी
 • समृद्धी महामार्गाच्या अंतर्गत गोदामं, शीतगृह उभरण्याचा मानस
 • 7000 किमी रस्त्यांसाठी2255 कोटी निधीची तरतूद
 • 4509 किमीवरून3 वर्षांत15, 404 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बनवले.
 • रस्त्याच्या दुपदरीकरणाचे26  हजार कोटींचे प्रकल्प प्रगतीपथावर.
 • महाराष्ट्रात300 मेगावॅट वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यात येणार. ग्रीन सेस फंडातून350 कोटींची तरतूद.
 • गृह विभागाच्या विकासासाठी13 हजार385 कोटींची तरतूदपोलिसांच्या बळकटीकरणासाठी13 हजार385  कोटींची तरतूदमुंबई मेट्रोसाठी130 कोटींची तरतूद. नवी मुंबई, नागपूर, पुणे -90 कोटी
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य