Wednesday, 16 January 2019

छत्तीसगडमध्ये मध्यरात्री माओवाद्यांचा धुमाकूळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, छत्तीसगड

सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात एका खाजगी बससह दोन तेलंगण राज्य बस आणि चार खासगी वाहने जाळली. सुकमा हैदराबाद हायवेवर दोरनापालजवळ ही घटना घडलीय. सूत्रांच्या माहितीनुसार,. या बसमध्ये काही प्रवासी असल्याचे समजते. यामध्ये एका पोलिसाची गोळया घालून हत्या करण्यात आली आहे.

तेलंगण राज्य मार्ग परिवहन महामंडळ (टीएसआरटीसी) बस, हैदराबाद-द्वितीय डिपो या दोन्ही बसेस् माओवाद्यांनी पेटवून दिल्या. या बसेस् जगदलपूर आणि छत्तीसगडमधील बैलादिल्ला शहराकडे जात होत्या. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी प्रक्रिया वाढविण्यात आली. तसेच, आरटीसी अधिकाऱ्यांनी तणावपूर्ण परिस्थितीत सुधार होईपर्यंत आंतरराष्ट्रीय बस सेवा बंद करण्याचा निर्णय छत्तीसगडमध्ये घेण्यात आला आहे.

chattisgrh2.png

 

 

भद्रचलोम सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी छत्तीसगडच्या सीमेवर संवेदनशील भागावर कठोर निर्बंध लावले आहेत. या तणावग्रस्त भागात संशयास्पद घटकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीने संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.

तेलंगण राष्ट्र समितीच्या नेत्यांना एजन्सीतील अंतर्गत भागामध्ये प्रवेश न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शुक्रवारी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात दहा नक्षलवादी बंडखोरांचा खून केल्याच्या आरोपावरून माओवाद्यांनी या बससेवांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य