Tuesday, 11 December 2018

महाराष्ट्राची अभूतपूर्व मुलाखत, प्रश्न महाराष्ट्राचे ....उत्तरं शरद पवारांची

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पुण्यात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. ज्यामध्ये राज ठाकरे यांच्या फुलटॉस प्रश्न शरद पवारांनी बेधडकपणे टोलावुल लावले. राज ठाकरेंनी मुलाखतीच्या सुरुवातीला शरद पवारांचा सत्कार केला. मी कधीही भाषणासाठी जितका घाबरलो नाहीतितकी आज मला भीती वाटत अशी भावना मुलाखतीच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले कीमला जर प्रश्न विचारायचे असतील तर मी नेहमीचे प्रश्न विचारणार नाही.  महाराष्ट्राला जे प्रश्न पडलेत तेच मी विचारणार. आणि माझी अपेक्षा आहे की पवार साहेब दिलखुलासपणे त्याची उत्तरं देणार.

राज यांनी आरक्षण, वेगळा विदर्भ या मुद्यांवर विचारलेल्या प्रश्नांवर पवारांनी आपली भूमिका मांडली. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर , वेगळा विदर्भ हे अमराठी नेतृत्वाचं स्वप्न असल्य़ाचं परखड मत पवारांनी व्यक्त केलं. जनमताचा कौल घ्या आणि तर वेगळा विदर्भ करा अशी दुटप्पी भूमिका मांडायलाही पवार विसरले नाहीत. “प्रत्येक महापुरुषाकडे काही जण जात म्हणून पाहतातते बदलावंसं वाटत नाही का?” त्या राज यांच्या ठाकरी प्रश्नाला पवारांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं जरी असलं तरीही उत्तर देताना त्यांनी बाळासाहेबांची अप्रत्यक्ष मदत घेतली, “जात नाहीकर्तृत्व बघाहि बाळासाहेबांची शिकवण असल्याची आठवण त्यांनी करुन दिली. बाळासाहेबांनी कधी जात पाहिली नाहीकर्तृत्व पाहिलं. आर्थिकदृष्ट्या आरक्षण असावं काया प्रश्नाला धरुन महाराष्ट्रात कायमच चर्चांचे फड रंगत असतात. मात्र शरद पवार यांच्यासारख्या महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी नेत्याने आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका आणखी खोल चर्चेचा विषय ठरणार आहे. आता यावर इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय असतीलहे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुलाखत चांगली रंगली असली तरीही राज यांच्या रँपीड फायर मधल्या आवडता व्यक्ती कोण राज कि उद्धव या जाहीर अडचणीत आणणा-या प्रश्नाला पवारांनी दिलेलं हजरजबाबी उत्तरांनं मुलाखतीचा शेवट नक्कीच गोड झाला असणार ...

 

तुषार शेटे

न्यूज एडीटर

जय महाराष्ट्र न्यूज

loading...

Top 10 News

राशी भविष्य